Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
08-07-2021, 12:50 PM
(This post was last modified: 08-07-2021, 12:59 PM by neerathemall. Edited 1 time in total. Edited 1 time in total.)
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
राजा सूर्यभान दयाळू व न्यायप्रिय राजा होता.राजाची राणी चंद्रप्रभा ही सदगुणी होती...राजा ला एक पुत्र होता आर्यविर..आर्याविर ही वडीलांसारखाच ..दयाळू व न्याय प्रिय होता..सर्व गुणान मध्ये निपुण होता.. आर्य विर आता मोठा झाला होता.. राजाचा सेनापती.. रंदन..त्याची एक कन्या होती.. वशिका.. वशिका ..दिसायला सुंदर होती पणं तिला गरिबांची चीड येत असे..ती त्यांना तुच्छ लेखत असे..तिला आपल्या सौंदर्याचा गर्व होता.. आर्य वीर सोबत लग्न करण्याची व राणी होण्याचं स्वप्नं होत तिचं..आणि सेनापतींची ची ईच्छा होती की वशिका राणी बनावी..सेनापती व वशीका राजा समोर खूपच चांगले वागत असत त्यामुळे राजा सूर्यभान ला वशिका आपल्या आर्य वीर साठी योग्य आहे असे वाटू लागले होते ..राजा ने सेनापतीला वशिका सोबत आर्य वीर च लग्न लावून देण्याचे वचन दिले होते ..त्यामुळे सेनापती व वशिका दोघे ही खुप खुश होते..आणि आर्य वीर ला मात्र या गोष्टीची काहीच माहिती नव्हती.. त्याला वाशिका ची वागणूक इतरा न कडून समजली होती ..पणं ती राजवाड्यात राहिली आहे त्यामुळे तिचा स्वभाव असा आहे असे आर्य वीर ला वाटले होते.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
एके दिवशी वशिका आपल्या एका दासिवर खूप ओरडत होती..राजकुमार आर्य वीर तिच्या दालना समोरून जात होता..की त्याला वाशीका चा आवाज ऐकू आला..त्याने आत जावून पाहिले तर एका दासीवर वशिका ओरडत होती..त्या दासीने आपले तोंड पदराने झाकले होते त्यामुळे तिचा चेहरा दिसू शकत नव्हता..दासीने चुकून वशिका च्या सुंदर ड्रेस वर पाणी सांडले होते..ती दासी शांत उभी राहून वशिका च बोलणं ऐकून घेत होती.. माफ करा राजकुमारी मी मुद्दाम नाही केलं..मी आज च इथे आली आहे माझी आई तुमच्या कडे काम करते आज ती आजारी आहे म्हणून मी आले आहे ..मला इथलं काही माहीत नाही ..पुन्हा चूक होणार नाही अस ती वशिका ला विनवत होती..राजकुमार त्या दिशेने आला..पणं तो त्या दासीचा आवाज ऐकुन स्थब्ध झाला होता..किती गोड आवाज आहे ..तो आतुरतेने तिचं बोलणं ऐकत होता.. वशिका ने आर्य वीर ला पाहिलं व ती त्या दासिवर ओरडणं सोडून तिला जा म्हणून सांगते..दासी पळतच बाहेर जाते.. आर्य वीर ही तिच्या मागे जातो..त्याला तिचा चेहरा पाहायचा असतो.. दासी बागेच्या दिशेने जाते ..तिथे जावून ती रडत असते ..की आर्य वीर मागून येतो ..ती त्याला पाहून शांत होते..आर्य वीर तिला ती कोण आहे विचारतो..तेव्हा ती सांगते की ती त्याच्या सैन्यात काम करणाऱ्या एका सैनिकाची मुलगी आहे व तिची आई राजवाड्यात दासी आहे ..
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
आई आजारी असल्या मुळे ती आज आली होती..आर्य वीर ला तिचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा होते ..तिचा आवाज इतका गोड आणि सुंदर आहे तर ती कशी आहे असा तो विचार करत असतो..तो तिचं नाव विचारतो तेव्हा ती देविका सांगते..त्या नंतर मात्र तो तिला चेहऱ्यावर चा बुरखा दूर करायला सांगते..ती नकार देते पणं तो राजकुमार असतो आणि त्याची आज्ञा असते म्हंटल्यावर देविका आपला चेहरा राजकुमाराला दाखवते..राजकुमार आर्य वीर तर तिला पाहूनच तिच्या प्रेमात पडतो ..इतकी सुंदर असते देविका..लांब केस ..गोरी पान..कानात छोटेसे झूमके ..गळ्यात एक काळी दोरी व त्यात एक छोटासा निळा खडा..एकदम साधे कपडे पणं त्यात ही ती अप्रतिम सुंदर दिसत होती..राजकुमार तिला अस एक टक पाहत आहे हे पाहून देविका नकळत हसते आणि लाजते ही ..आर्य वीर तर तिच्या हसण्याने अजुनच घायाळ होतो..
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
राजकुमार आर्य वीर .. देविका ला पाहूनच तिच्या प्रेमात पडतो..देविका लाजून तिथून निघून जाते आणि आर्य वीर पुन्हा राजवाड्यात निघून जातो.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
दुसऱ्या दिवशी आर्य वीर राज्यात फेर फटका मारायला घोड्यावरून निघतो...रस्त्यात भेटणाऱ्या आपल्या प्रजेला काही त्रास आहे का याची तो विचारपूस करतो..आपली प्रजा सुखी आणि समाधानी आहे हे पाहून तो ही खुश होतो.बरेच फिरून झाल्यावर तो परत आपल्या राज वाड्याकडे जायला निघतो..की दुरून त्याला एक सुंदर स.. गाणं ऐकू येत..तो त्या दिशेने जातो समोर एक छोटंसं महादेवाचं मंदिर असत..तिथे लोक पूजा व आरती करत असतात...आणि राजकुमार आर्य वीर जेव्हा त्या गाण म्हणणाऱ्या मुलीला पाहतो तेव्हा तो लगेच ओळखतो ..ती देविका असते..तिचाच मधुर आवाज आर्य वीर ला मंदिरा कडे खेचून आणतो ..सर्व जण राजकुमार आलेला पाहतात व त्याला मंदिरात जायला वाट मोकळी करून देतात..प्रत्येक जण आश्चर्य चकित होतो राजकुमार ला पाहून ..देविका त्याला आरती देते ..तो तिला पाहून हसतो ..देविका पुन्हा सुंदर स लाजते..देविका महादेवाची भक्त असते..ती दर रोज त्या मंदिरात पूजेला येत असते व महादेवाची आरती गात असते.आर्य वीर ला देविका खूपच आवडते..तो ही आता दर रोज मंदिरात येऊ लागतो..राजकुमार मंदिरात येऊ लागल्या मुळे ..मंदिरात बरीच वर्दळ चालू होते.. मंदिरं दर रोज सुशोभित करण्यात येऊ लागले...आर्य वीर ही मना पासून महादेवाची पूजा करीत असे..
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
व ..देविका ची आरती आवर्जून ऐकत असे..तो असा दर रोज आपल्या प्रजा जनान मध्ये येऊ लागल्या मुळे ..सर्व जण आर्य वीर ला..आपल मानू लागले..तो प्रजेची निष्ठेने विचारपूस करी..त्यांना काही मदत लागली की करे..त्यामुळे आर्य वीर प्रजे मध्ये लोकप्रिय झाला..राजा ला ही जेव्हा आर्य वीर च कौतुक कानी ऐकू येऊ लागलं तेव्हा तो ही खुश झाला व आता योग्य वेळ आली आहे ..आर्य वीर च्या लग्नाची व त्याच्या हाती राज पाट सोपवण्याची असे राजाने ठरवले...राजाने आर्य वीर ला बोलावून वशिका व त्याच्या लग्नाची बातमी त्याला दिली व लग्ना नंतर तो या राज्याचा नवीन राजा म्हणून काम पाहिलं हे ही सांगितलं ..परंतु ..आर्य वीर ने वशिका सोबत लग्न करायला नकार दिला..राजा ने त्याला कारण विचारले तेव्हा त्याने देविका सोबत लग्न करण्याची इच्छा दर्शवली..पणं देविका एका सैनिकाची मुलगी आहे हे कळलं तेव्हा राजा ने आर्य वीर ला लग्न करण्याची परवानगी दिली नाही..
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
वशि का .. ला जेव्हा कळाल की आर्य वीर ला एका सैनिकाच्या मुली सोबत लग्न करायचं आहे त्यामुळे त्याने वशिका ला नकार दिला आहे ..तेव्हा ती रागाने लालबुंद झाली..सेनापतीने तिला राजा अस होवू देणार नाही व तिचं च लग्न आर्य वीर सोबत होईल म्हणून समजावले..परंतु राजा ही पुत्र हट्टा पुढे नमला व त्याने देविका व आर्य वीर च लग्न लावून दिलं..जेव्हा राजा ने देविका ला पाहिले तेव्हा राजकुमारा ची निवड योग्य असल्याची त्याला खात्री पटली.. वशिका तर रागात वेडी झाली होती..आणि त्यात देविका तिच्या हुन ही सुंदर आहे व आता ती या राज्याची राणी झाली हे पाहून तर ती खूपच भयानक झाली होती..देविका ला मारून आर्य वीर सोबत लग्न करायचं या साठी ती आता देविका ला मारण्याची संधी शोधू लागली...
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
2.............................
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
देविका च सर्वत्र होणार कौतुक ऐकुन वशिका चा खूपच जळ फाट होत असतो ..शेवटी ती चिडून देविका ला मारायचं ठरवते.
देविका ला फुलांची फार आवड..दर रोज ती महादेवाची पूजा करीत असे..त्यासाठी ती स्वतः राजवड्या समोर असलेल्या बागेतून फुले आणत असे..आज ही ती फुले आणायला गेली असताना .. वशिका पुरुष वेष धारण करून लांबून तिच्या वर बाणाने वार करते बान देविका ला लागणारच असतो की ती खाली वाक ते.. व बान तिच्या दंडाला घासून जातो ..ती मोठ्याने ओरडते..तिचा आवाज ऐकुन सैनिक व आर्य वीर धावत बागेत येतात.. तर देविका बेशुद्ध पडलेली असते..सैनिक बागेत शोध घेऊ लागतात..पणं त्यांना कोणी सापडत नाही.. वशिका केव्हाच तिथून पळत जाऊन आपल्या दालनात पोहचते.. व ती ही वेष बदलून बागेत पोहचते..तिला वाटत..देविका मेली असेल..पणं फक्त तिच्या हाताला लागलेल पाहून ती जास्तच रागीट होते..आर्य वीर देविका ला आपल्या दालनात घेऊन जातो वैद्याला बोलावून तिच्या वर उपचार होतात..जास्त लागलेलं नसत पणं ती घाबरून बेशुद्ध झालेली असते.. ती शुद्धीवर येते..तेव्हा आर्य वीर तिला कोणी बान मारला हे विचारतो पणं तिने पाहिलेलं च नसत..त्यामुळे ती सांगू शकत नाही..हे पाहून वशिका खुश होते..आर्य वीर देविका ची खूप काळजी घेतो..थोड्याच दिवसात देविका ठीक होते...आर्य वीर देविका वर खूप प्रेम करत होता.. तिला आता तो बागेत ही एक टी..जावू देत नसे..तिच्या भोवती पहारा ठेवला होता..देविका ला तो फार जपत होता..त्याने आपले गुप्तचर देविका ला बान कोणी मारला हे शोधण्या साठी नेमलेले असतात पणं काहीच पत्ता लागत नाही.. वशिका ची कोंडी होत होती.. परंतु तिने देविका ला मारण्या साठी पुन्हा कट रचला
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
..आर्य वीर व देविका झोपलेले असताना ..ती देविका वर तलवारीने वार करायचा प्रयत्न करते पणं आर्य वीर जागा च असतो त्याने झोपण्याच फक्त नाटक केलं होतं .. तो त्या वारा पासून देविका ला वाचवतो व आपली तलवार काढून वशिका सोबत लढू लागतो.. वशि का ने पुरुष वेष धारण केलेला असतो व चेहरा झाकलेला असतो त्यामुळे वार करणार कोण आहे हे आर्य वीर ला कळत नाही.. पण वशिका पेक्षा ही आर्य वीर तलवार बाजी मध्ये निपुण होता..तो तिच्या गळ्यावर तलवार ठेवतो व तिच्या चेहऱ्यावर वरच कापड दूर करतो .. वशिका ला पाहून देविका व आर्य वीर दोघांनी ही धक्का बसतो..आर्य वीर तिला हे सर्व का केलं विचारतो तेव्हा आपल्याला या राज्याची राणी होन्याची इच्छा असताना देविका मध्ये आली..आणि आता मी तिला संपवणार अस म्हणून ती पुन्हा देविका वर वार करायला जाते आर्य वीर तो वार आपल्या तलवारीने झेलतो व सैनिक बोलावून... वशिका ला कारागृहात ठेवतो..सेनापती राजा व आर्य वीर ,देविका ची माफी मागण्या च नाटक करतो व आपल्याला वाषिका च्या मनात चाललेल्या कटा बद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगतो..राजा व आर्य वीर मुलीच्या गुन्ह्याची शिक्षा वडीलाला द्यायची नाही..म्हणून त्याला सेनापती पदावरुन दूर करीत नाहीत.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
आर्य वीर आणि देविका खूपच खूष असतात..त्यांच गृहस्थ जीवन फार चांगलं चाललं होत..सेनापती ही थोडे दिवस शांत राहायचं ठरवतो..पणं त्याच्या मनात आपली मुलगी कारागृह मध्ये आहे याची आग लागलेली असते.
देविका एका सुंदर मुलाला जन्म देते..राज वाड्यात सर्वत्र आनंद पसरला होता..प्रजा ही आपल्या लाडक्या राजाच्या खुशीने खुश होती...मोठ्या थाटात ..छोट्या राजकुमाराचे नाव ध्रुवल ठेवलं जातं...
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
राजकुमार ध्रुवल खूपच सुंदर होता.. गोरा... गोबऱ्या गाला चा ..हळू हळू तो मोठा होवू लागला..राजवाड्यात सर्वत्र धावू लागला..राजा राणी सर्व जण त्याच्या बाल लीला पाहून खूपच खुश होते.. छोटा राजकुमार आता आठ वर्षाचा झाला होता..ध्रुवल खूपच हुशार होता..तो सतत सर्वांना प्रश्न विचारत असे..सर्व जण त्याची उत्तरे देता देता थकत असे..देविका त्याला महादेवाच्या मंदिरात घेऊन जात असे..तिथे तो ही देविका बरोबर आपल्या बोबड्या बोलीत महादेवाची आरती गात असे..सर्व जण ऐकुन खूपच खुश होते..पणं सेनापती मात्र आतून तळमळत होता..आपल्या मुलीला कराग्रहात टाकलं आणि इथे आर्य वीर आणि देविका आपल्या मुलाचं कौतुक करत बसले आहेत याचा त्याला खूप राग येऊ लागला..आपण जसे आपल्या मुलीच्या विरहात तडफडत आहोत तसचं राजा व राणी ही झुरले पाहिजेत या विचारांनी तो राजकुमाराला मारायचं ठरव तो ..पणं राजकुमार मरायला हवा व त्याचा अाळ आपल्यावर येऊ नये याची खबरदारी घ्यावी लागणार अस तो ठरवतो..सेनापतीच्या ओळखीचा एक मांत्रिक असतो त्याच्या कडे खूप विषारी साप असतात..सेनापती मांत्रिका कडे जातो व त्याला आपली अडचण सांगतो ..
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
मांत्री क..त्याला सापाच एक छोटं पिल्लू देतो..हे छोटा साप कशाला मोठा द्या अस तो मात्रिका ला बोलतो तेव्हा मांत्रिक त्याला सांगतो सापच पिल्लू जरी असल तरी ते खूप विषारी आहे ..तुझं काम होईल तू जा घेऊन ..सेनापती त्याला बऱ्याच सोन्याच्या मोहरा देतो व ते पिल्लू घेऊन राजवाड्यात जातो..रात्रीच्या वेळी सर्व झोपले असताना सेनापती ध्रुवल च्या दालनातून ते सापच पिल्लू आत सोडतो..ध्रुवल गाढ झोपेत असतो ..सेनापती खुश होतो की आता राजकुमार ध्रुवल मरण पावणार म्हणून...तो ही निश्चित पने जावून झोपी जातो..सकाळी राजवाड्यात सर्वत्र शोक कळा पसरली असेल असा तो विचार करतो..पणं नाही सकाळी जेव्हा तो उठून पाहतो तर राजवाड्यात सर्व व्यवस्थित असत..राजकुमार ध्रुवल ही राजवाड्याच्या बागेत देविका व दासिन सोबत खेळत असतो..सेनापती पूर्ण राजवाड्यात ते सापा च पिल्लू शोधतो पणं ते त्याला कुठेच सापडत नाही.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
राजकुमार ध्रुवल ला पोट दुखी चा त्रास सुरू होतो..आर्य वीर वैद्यांना बोलावून त्याच्या वर उपचार करतो परंतु काहीच फरक पडत नाही..रात्री राजकुमार झोपला असताना सेनापती पुन्हा त्याच्या दा लना कडे जातो...सकाळी एक दासी पहाते की सेनापती राजकुमाराच्या दाल ना पुढे मरून पडला आहे ..ती घाबरून ओरडू लागते ..सर्व जण गोळा होतात..ध्रुवल मात्र गाढ झोपलेला असतो..राजा चौकशी करतो तेव्हा सेनापतीच्या पायाला साप चावल्याच समजते ..तो पूर्ण राजवाड्यात सापाचा शोध घ्यायला सांगतो पणं साप कुठेच सापडत नाही.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
ध्रुवल दिवस भर पोट दुखी ने त्रस्त असायचा पण रात्री मात्र गाढ झोपायचा..दूर दूर वरून वैद्य येऊन त्याचं उपचार करू लागले पणं कोणालाच त्याच्या दुखण्याचे निदान लागेना.. एकी कडे ..ध्रुवल ची पोट दुखी आणि दुसरी कडे..रोज रात्री कोणा ना कोणाचा जाणारा जीव ...आर्य वीर खूप चिंतित होता...राज्यातली शांती भंग झाली होती..राजवाड्यात यायला आता सर्व जण घाबरु लागले होते..देविका ही खूप चिंतित होती ..ध्रुवल ची वाढणारी पोट दुखी पाहून ती खूप रडत असे...एकदा ती राज्यातल्या महादेवाच्या मंदिरात ध्रुवल घेऊन दर्शनाला गेली तेव्हा तिथल्या पुजाऱ्याने .. डोंग रा पलीकडे गुहेत राहणाऱ्या एका साधू बद्दल तिला सांगितले व ते तिची मदत करतील ..ध्रुवल ला त्यांच्या कडे घेऊन जाण्याचा सल्ला पुजाऱ्याने देविका ला दिला.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
देविका ने आर्य वीर ला सांगितले ..पहिल्यांदा तर तो तयार झाला नाही पणं देविका ने त्याला समजावले तेव्हा ..आर्य वीर ,देविका व ध्रुवल एका रथात बसून साधू च्या गुहेकडे निघाले...साधू जवळ पोहचल्या वर सर्वांनी साधू ला नमस्कार केला..देविका ने साधू ला विनंती केली ..ध्रुवल ला ठीक करण्याची..साधू महाराज अनेक विद्या न मध्ये पारंगत होते..अलौकिक शक्ती होती त्यांच्या कडे ..बरेच वर्ष तपशच्र्या केली होती त्यांनी..साधू नी त्यांना त्या रात्री तिथेच थांबण्या स सांगितले ..रात्र झाली तेव्हा सर्व जण झोपी गेले ..पणं ध्रुवल ला झोप वून..सर्व जण गुहेच्या एका बाजूला लपून बसले...थोड्या वेळ वाट पाहण्यात गेला की ..ध्रुवल च्या पोटातून एक साप बाहेर आला ..तशी देविका ,आर्य वीर सर्व जण खूप घाबरुन गेले..साधू ने त्यांना शांत राहायला सांगितले.. साप तोंडातून बाहेर येऊन इकडे तिकडे फिरू लागला..देवाच्या मूर्ती जवळ आलेले दूध त्याने पिऊन टाकले ..
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
व तो पुन्हा ध्रुवल च्या तोंड वाटे त्याच्या पोटात गेला..देविका ते पाहून रडू लागली..आर्य वीर ही खूप चिंतित झाला..साधू ने त्यांना एक उपाय सांगितला..दुसरा दिवस ही ते साधू च्या गुहेत च राहिले ..ध्रुवल झोपला तसे त्याच्या पासून थोड्या अंतरावर देविका ने दूध भरून छोटी छोटी मडकी ठेवली... व ती ही गुहेच्या एका बाजूला जाऊन लपून बसली.. साप पुन्हा पोटातून बाहेर आला .. वळ वळ करत त्या दुधाच्या मडक्यात त्याने आपले तोंड घातले तसे आर्य वीर ने आपल्या तलवारीने त्या सापाचे दोन तुकडे केले..तसा साप म रून पडला...आर्य वीर व देविका ने साधू ला साप ध्रुवल च्या पोटात कसा गेला असेल विचारले ..तेव्हा साधू ने आपल्या दिव्य दृष्टी ने पाहून त्यांना सांगितले की सेनापती ने तो साप ध्रुवल च्या दालनात सोडला पणं तो साप पाण्याच्या भांड्यात जाऊन बसला..गडबडीने ध्रुवल ने रात्री ते पाणी न पाहतच पिले त्यामुळे त्या पाण्याबरोबर त्याच्या पोटात गेला..सेनापतीने दुसऱ्याचा वाई ट विचार करून केलेलं कृत्य त्याच्या वरच उलटले ..सापाचा पाहिलं दंश सेनापतीला च झाला..देविका ,आर्य वीर व ध्रुवल साधू महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा आपल्या राज्यात परत आले..ध्रुवल ची पोट दुखी कायम ची बंद झाली ..तो पूर्वी सारखा सर्वत्र बागडू लागला.. हळू हळू प्रजेला वाटणारी राजवाड्याची भीती नाहीशी झाली..राज्यात पुन्हा ..शांती निर्माण झाली.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
08-07-2021, 12:55 PM
(This post was last modified: 08-07-2021, 12:58 PM by neerathemall. Edited 2 times in total. Edited 2 times in total.
Edit Reason: समाप्त
)
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
Posts: 84,363
Threads: 890
Likes Received: 11,315 in 9,381 posts
Likes Given: 20
Joined: Dec 2018
Reputation:
118
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
•
|