Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
Adultery Pre-wedding Photoshoot
#2
हॅलो विशाल, कसे आहात? माझ्या होणाऱ्या बायकोने मला कॉल करून विचारले,
"मी ठीक आहे, स्वाती, तू कशी आहेस गं?" मी तिला परत विचारले.

"मी पण अगदी मस्त आहे. हो बरं, काल आपण जे प्री-वेडिंग शूटबद्दल बोललो होतो, त्याबद्दल काही ठरलं का?" तिने मला विचारले.

"अगं हो, तुला सकाळी सांगायचं राहूनच गेलं. अगं, एक प्री-वेडिंग शूटवाला भेटला आहे. त्यालाच आपल्याला भेटायला जायचं आहे, बघू तरी काय म्हणतात ते," मी स्वातीला म्हणलो.

"हो मग तर बरं झालं, चालेल, तर मग कुठे भेटायचं?" स्वातीने मला विचारले.

"अगं, ते मॅकडोनाल्ड आहे ना, तिथेच भेटू. ऑफिस सुटल्यावर मी लगेच निघतो, तूही तिथेच ये," मी तिला म्हणलो.

"हो चालेल, तर मग मी तिथे बरोबर साडेपाच वाजता येते, तुम्हीही लगेच निघा," असं म्हणून स्वातीने फोन ठेवून दिला.

स्वाती आणि माझं काही दिवसापूर्वीच लग्न ठरलं होतं. माझी सर्व फॅमिली इथे पुण्यामध्येच राहत होती, तर स्वातीची सुद्धा सर्व फॅमिली पुण्यामध्येच राहत होती. तसं आमच्या दोघांच्या फॅमिलीचं मूळगाव हे खेडेगावाचंच होतं, पण आमचे बाबा इकडेच राहत असल्याने मी सुद्धा पुण्यामध्येच शिक्षण घेऊन आता एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे. चांगला पगार असल्याने मी लवकरच सेटल झालो होतो. स्वातीचे बाबा माझ्या बाबांचे चांगले मित्रही होते. आमच्या दोघांची एकमेकांची भेट अधूनमधून होतच होती. दोन्ही घरच्यांना हेच वाटत होतं की आमच्या दोघांची जोडी खूप छान शोभून दिसते, त्यामुळे घरच्यांनी स्वातीबरोबर माझं लग्न ठरवलं. मलाही स्वाती आवडतच होती, पण तिला कधी हे विचारायची माझी हिम्मत झाली नव्हती.

स्वातीचं चारित्र्य खूपच चांगलं होतं, दिसायलाही ती खूपच सुंदर आहे. स्वातीचं वय सध्या २४ वर्षे आहे. ती एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये घरातूनच काम करते. ती सुद्धा माझ्यासारख्याच लहानपणापासून पुण्यामध्येच वाढलेली आहे. ती जरी शहरात वाढलेली असली, तरी सुद्धा तिच्यावर घरच्यांचे चांगले संस्कार झालेले होते. शहरात राहत असल्याने ती बऱ्यापैकी मॉडर्न वागत होती. जीन्स पँट, टॉप, स्लीवलेस टॉप्स अशा प्रकारची कपडे ती घालायची. कधीकधी तिला साडी नेसायला सुद्धा खूप आवडायची. साडीमध्ये ती खूप सुंदर दिसायची. तिच्या साडीवरचे सर्व ब्लाउज हे मॉडर्न आणि स्लीवलेस असल्याने तिच्या सौंदर्यात अजूनच भर पडत होती.

घड्याळामध्ये सव्वापाच वाजले आणि मी ऑफिसच्या खुर्चीवरून उठलो. ऑफिसमधून बाहेर पडून पार्किंगमध्ये जाऊन बाईक स्टार्ट केली. अवेंजर गाडी घेऊन मी साधारण पाच मिनिटांत मॅकडोनाल्डजवळ पोहोचलो. तर अगदी समोरच स्वाती उभी होती. मी तिच्याकडे बघून स्मितहास्य केले. ती माझ्याकडे, माझ्या जवळ येऊ लागली. स्वातीने आज स्किन फिट अशी जीन्स पँट घातली होती, त्यावर स्लीवलेस असा ऑफ-व्हाइट कलरचा टॉप तिने घातला होता. त्या टॉपवर हलक्या गुलाबी रंगाची फुले होती. तिचा तो टॉप स्लीवलेस असल्यामुळे त्या स्लीवलेस टॉपमधून तिचे गोरे कोमल दंड अगदी मस्त दिसत होते. स्किन फिट जीन्समधून तिच्या मांड्यांचा आणि पायाचा आकार अगदी स्पष्ट दिसत होता. ती कमालीची सुंदर दिसत होती. मला माझ्या नशिबाचा कधीकधी हेवा वाटत होता की, स्वातीसारखी सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात आली.

"हाय, विशाल," ती स्मितहास्य करत मला म्हणाली.

"हाय, स्वाती, बैस, लगेच निघूया," असे मी तिला म्हणलो आणि ती पटकन माझ्या बाईकवर बसली.
मी हँडलला अडकवलेल्या मोबाईलमध्ये स्टुडिओचे लोकेशन टाकून ट्रॅकिंग चालू केले. तिथून अगदीच ते दहा मिनिटांच्या अंतरावर होतं. मी बाईकला सेल्फ-स्टार्ट दिला आणि बाईक धावू लागली.

साधारण दहा मिनिटांतच एका कॉम्प्लेक्सच्या खाली पोहोचलो.
कॉम्प्लेक्सच्या एका कोपऱ्याला 'दिलबहार स्टुडिओज' असा बोर्ड झळकत होता. मी स्वातीला खूण केली, स्वाती बाईकवरून खाली उतरली. तिच्या पाठोपाठ मी सुद्धा खाली उतरलो. एक नजर मी स्टुडिओकडे टाकली, स्टुडिओ चांगला पॉश वाटत होता. आम्ही दोघेही स्टुडिओकडे निघालो. पूर्ण ऑफिस त्यांचं चांगलंच पॉश होतं. स्टुडिओमध्ये गेल्यावर आतमध्ये थंडगार एसीची हवा येत होती. आतमध्ये अगदी कॅफेमध्ये असतं, तशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट होती. प्रत्येक टेबलाजवळ कोणी ना कोणी कपल बसलेलं होतं आणि ते प्री-वेडिंग शूट कसं करणार याबद्दल समजून घेत होते. सर्व ठिकाणी त्यांचे सेल्समन हे एंगेज दिसत होते, त्यामुळे मी रिसेप्शनला गेलो आणि तिथे विचारले,
"मॅडम, आम्हाला प्री-वेडिंग शूटबद्दल चौकशी करायची आहे. माझ्या मित्रानेच इथला रेफरन्स दिला होता, तर कोणी माहिती देऊ शकेल का?" मी समोर बसलेल्या मुलीला म्हणलो.
मुलीने माझ्याकडे बघून एक हलकं स्मितहास्य केले.

"हो का नाही सर, एक पाच मिनिटे वेट करा, मी तुम्हाला माहिती देण्यासाठी कोणालातरी पाठवते," असं म्हणून ती मुलगी म्हणाली आणि तिने एका सोफ्यावर आम्हाला बसण्यासाठी इशारा केला.

आम्ही जाऊन तिथे शांतपणे बसलो. मी त्या रिसेप्शनिस्टकडेच बघत होतो, ती कधी कोणाला अरेंज करते का, याची मला उत्सुकता लागलेली होती. इतक्यात तिच्या डेस्कवरचा टेलिफोन वासला. तिने रिसिव्हर उचलून कानाला लावला आणि "हॅलो" असं म्हणाली. पलीकडून काहीतरी विचारणा झाली असावी, तिने होकारार्थी मान हलवली आणि रिसिव्हर क्रेडलवर ठेवून ती तडक आमच्याकडे निघून आली.

"सर, मॅडम, तुम्हाला आमच्या मोठ्या साहेबांनी बोलावलंय, तेच तुम्हाला फोटोशूटबद्दल सांगतील," ती मुलगी अगदी लगबगीने म्हणाली.

"बरं, चालेल," असं म्हणून मी म्हणलो आणि आम्ही दोघेही तिथून उठलो आणि त्या मुलीच्या पाठोपाठ जाऊ लागलो.

तिने आम्हाला एका केबिनकडे नेले. त्या केबिनच्या सर्व काचा पूर्ण काळ्या कलरच्या होत्या, म्हणजेच केबिनच्या आतमध्ये काय चाललंय हे बाहेरून दिसण्याचा काहीच प्रश्न नव्हता. त्या मुलीने त्या केबिनचा दरवाजा उघडला आणि आम्हाला आत जायला सांगितलं. आम्ही दोघेही आत गेलो. तिथे बसलेल्या व्यक्तीने मानेनेच आम्हाला आतमध्ये यायला सांगितले आणि समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. समोरच्या खुर्चीमध्ये बसलेल्या व्यक्तीची पर्सनॅलिटी चांगलीच भारदस्त होती. दिसायला ती व्यक्ती चांगलीच स्मार्ट दिसत होती. जवळपास चाळीशीच्या आसपास त्यांचं वय असावं. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता आणि डोळ्यांमध्ये चमक होती.

"नमस्कार, मी राघव, काय मदत करू शकतो आपली?" त्या व्यक्तीने आपली ओळख करून देत म्हटले.

"नमस्कार सर, मी विशाल आणि ही माझी होणारी बायको स्वाती," मी म्हणलो.

"नमस्कार, नमस्कार," ते आम्हा दोघांकडेही बघत म्हणाले.

"राघव सर, आम्हाला तुमच्या स्टुडिओबद्दल एका मित्राकडून समजलं होतं, तुम्ही चांगल्या प्रकारे प्री-वेडिंग शूट करता, असं तो मला म्हणाला होता, म्हणून म्हटलं आम्हालाही प्री-वेडिंग शूट करायचं आहे, तर तुमच्या स्टुडिओमध्ये यावं," मी म्हणलो.

"अगदी योग्य निर्णय घेतलाय बघा तुम्ही, विशाल. आम्ही प्री-वेडिंग फोटोशूट खूप चांगल्या प्रकारे करतो, त्यातल्या त्यात तुमच्यासारख्या स्वीट कपल्सचे," हसत राघव म्हणाले.

"सर, तुम्ही काही सॅम्पल्स दाखवू शकता का?" मी विचारले.

"येस, येस, ऑफ कोर्स, ऑफ कोर्स! प्लीज विशाल, मला राघवच म्हण, मी काही तुझ्यापेक्षा इतकासाही मोठा नाही," हसतहसत राघव म्हणाले.

"येस, येस, राघव," मी त्यांना म्हणलो.

त्याबरोबर आम्ही तिघेही हसलो आणि राघवांनी आम्हाला त्यांनी केलेल्या प्री-वेडिंग फोटोशूटचे काही सॅम्पल्स दाखवायला सुरुवात केली. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्री-वेडिंग शूट केलेलं दिसत होतं, पण त्यातलं एक महत्त्वाचं होतं, ते म्हणजे एक फार्महाऊस. त्या फार्महाऊसच्या आजूबाजूचे लोकेशन अगदी चांगलं वाटत होतं, तिथे एकांत दिसत होता, इतर कुठल्याही लोकांची गर्दी अशी काहीच नव्हती. राघवांनी आम्हाला चार-पाच प्रकारची लोकेशन्स दाखवली. त्या लोकेशन्सवर कपल्सचे काढलेले वेगवेगळ्या अँगलचे फोटोही त्यांनी आम्हाला दाखवले. काही फोटो संध्याकाळचे आणि रात्रीचे होते, अतिशय रोमँटिक अशा पद्धतीने त्यांनी ते फोटोशूट कपल्सकडून करून घेतलेलं दिसत होतं. सर्व कपल्सच्या चेहऱ्यावर नॅचरल आनंद अगदी ओसंडून वाहत असलेला दिसत होता. बऱ्याचशा फोटोमध्ये कपल्स अगदी एकमेकांना घट्ट मिठी मारून होते, तर काही फोटोमध्ये कपल अक्षरशः किसिंग करत होते. बऱ्याचशा फोटोमध्ये नवीन लग्न होणाऱ्या मुलीने खूपच उत्तेजक असे कपडे घातलेले दिसत होते. बऱ्याचशा मुलींचे ड्रेस हे स्लीवलेसच होते. ते सर्व पाहून आम्ही दोघेही हरकून गेलो होतो. आम्हालाही अशाच प्रकारचं फोटोशूट करायचं होतं.

"बरं, बोला, मग कुठल्या प्रकारचं फोटोशूट तुम्हाला करायचं आहे?" राघव म्हणाले.

"आम्हाला ते फार्महाऊसवाला लोकेशन चांगलं वाटतंय. काय गं, स्वाती, तुला काय वाटतं?" मी विचारले.

"हो, विशाल, अगदी बरोबर आहे, तुमचं लोकेशन खूपच छान आहे," स्वाती सुद्धा आनंदाने म्हणाली.

"अगदी बरोबर लोकेशन निवडलं आहे तुम्ही. आता सध्या जस्ट पावसाळा संपलेला आहे, तिथलं वातावरण सुद्धा चांगलं अल्लादायक आहे, खूप मस्त लोकेशन आहे ते आता फोटोशूट करायला. पण त्या लोकेशनला फक्त एकच प्रॉब्लेम आहे," राघव कपाळावर आठ्या आणत म्हणाले.

"काय हो? काय प्रॉब्लेम आहे असा?" मी त्यांना विचारलं.

"त्याचं असं आहे, विशाल, तिथे लोकेशन थोडंसं दूर आहे. इथून एका दिवसामध्ये हवे तसे फोटो काढणे आणि परत येणे जमण्यासारखे नाही, म्हणजे तिथे एक दिवस स्टे तरी हवाच. सर्व कपल्सना मी असाच सल्ला दिला आहे आणि सर्व कपल्सनी एक दिवस स्टे केला आहे आणि जवळपास सगळ्यांनाच दुसऱ्या दिवशी सुद्धा तिथेच राहण्याची खूपच इच्छा झाली होती," असं राघव म्हणाले.

"अच्छा, अस आहे का? एक दिवस स्टे असेल तर मात्र आम्हाला थोडा विचार करावा लागेल. हो की नाही, स्वाती?" मी म्हणलो.

"पहा विशाल, मला घरच्यांना विचारलं पाहिजे. एक दिवस स्टे करायचा म्हणजे ते परवानगी देतात की नाही, याबद्दल मला शंकाच वाटते," स्वाती म्हणाली.
"हो, ते पण तू काही टेन्शन घेऊ नकोस, आई-बाबांना मी समजावून सांगतो. मी तुझ्यासोबत असल्यावर मग कसला आलाय टेन्शन? आणि तशीही आपली एंगेजमेंट झालेली आहे, म्हणजे अर्ध लग्न झालंच आहे की!" मी तिला हसत म्हणलो.

"बरं ठीक आहे, तुम्ही आई-बाबांना कॉल करून प्लीज समजवा. मला खरंच याच लोकेशनला प्री-वेडिंग शूट करायला जायचं आहे," अतिउत्साहाने स्वाती म्हणाली.

"बरं, समजा, मॅडमच्या आई-बाबांनी परवानगी दिली, तर आपण पुढची बोलणी करूया का?" राघव म्हणाले, त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती.

"हो, हो, नक्कीच राघव सर, पुढची बोलणी आपण करूया. म्हणजे तुमचे चार्जेस किती राहतील? राहण्याची, खाण्याची सोय सर्व त्यामध्ये इनपुट आहे का?" मी विचारले.
"हो, हो, विशाल, आमच्या पॅकेजमध्ये सर्व काही येणार! राहणे, खाणे सर्व काही, तुम्हाला काही एक खर्च करायची गरज नाही, सर्व पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. तर आमच्या पॅकेजची सध्या किंमत ४० हजार रुपये आहे, पण तुम्ही तुमच्यासाठी डिस्काउंट म्हणून ३५ हजार रुपये आम्ही यासाठी चार्ज करू," राघव म्हणाले.

"पस्तीस हजार खूप जास्त होतात हो सर, आम्हाला वाटलं वीस हजारपर्यंत तरी होईल," मी म्हणलो.

"नाही हो, एवढं कमी नाही होणार. बरं, तुमच्यासाठी म्हणून मी तीस हजार फायनल करतो, यापेक्षा काही कमी नाही होणार, प्लीज," राघव म्हणाले.

"बरं, चालेल, ठीक आहे," मी एकदा स्वातीकडे बघून म्हणलो. स्वातीनेही होकार दिला, तिचीही तयारी होतीच.

"बरं, चालेल, तर मग मी अमितची तुम्हाला ओळख करून देतो. अमित माझा असिस्टंटच आहे, तो तुम्हाला सर्व काही समजावून सांगेल, म्हणजे टूरवर जाण्यासाठी काय काय लागेल या सर्वांची माहिती तो देईल," असं म्हणून राघव यांनी एक फोन लावला.
Like Reply


Messages In This Thread
Pre-wedding Photoshoot - by Vishal1 - 06-10-2026, 02:25 PM
RE: Pre-wedding Photoshoot - by Vishal1 - 07-10-2026, 12:00 AM
RE: Pre-wedding Photoshoot - by kamraj85 - 07-10-2026, 11:09 AM
RE: Pre-wedding Photoshoot - by Vishal1 - 16-10-2026, 03:59 PM
RE: Pre-wedding Photoshoot - by Vishal1 - 16-10-2026, 06:58 PM
RE: Pre-wedding Photoshoot - by Subha Cocksuker - 19-10-2026, 11:07 AM
Pre-wedding Photoshoot - by Vishal1 - 06-10-2026, 02:26 PM



Users browsing this thread: 1 Guest(s)