30-06-2022, 01:43 PM
"डीजे आहे आणि गिटार वाजवतो." उत्तर देताना गार्गी घाबरली होती हे दिसत होतं. आपल्या बापाला तिने असं चिडलेलं कधीच बघितलं नव्हतं.
"तो तुझ्याएवढा दिसत नव्हता..."
"नाही... मोठा आहे..."
"किती मोठा?"
"३४ वर्षांचा आहे." गार्गीने उत्तर दिलं. तिची नजर पुन्हा जमिनीवर खिळली होती.
"गार्गी...." आपल्या डोक्याला हात लावून घेत लोकेश बेडवर बसला. त्याचा रागावण्याचा स्वर आता बदलला, "गार्गी, अगं तू फक्त १९ वर्षांची आहेस... हा कोण कुठला रॉनी... आत्ता काही महिन्यांपूर्वी भेटलेला..."
"डॅडी, आय लव्ह हिम..." गार्गी मध्येच म्हणाली.
"लव्ह? अगं गेले अडीच महिने तर आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. म्हणजे तीन महिन्यांच्या तुमच्या ओळखीतले पहिले काही दिवस सोडले तर तुमची भेटही झाली नसणार..."
"पण त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर..." गार्गी काहीशी अधीरपणे आणि निरागसपणे म्हणाली, "माझ्यासाठी तो स्वतःच्या बायकोला पण सोडायला तयार आहे..."
"बायको???" लोकेशला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला, "लग्न झालं आहे या रॉनीचं?"
"हो. तो ज्या पबमध्ये डीजे आहे तिथे ती वेट्रेस आहे."
"मी जगभर फिरलोय. अनेक लोक बघितलेत... आणि या सगळ्या अनुभवातून मी तुला सांगतो, हा रॉनी तुला वाटतो तसा चांगला माणूस नाहीये..."
"डॅडी तू त्याला एकदाही न भेटता हे म्हणतोयस..." गार्गी काहीशी रागवून म्हणाली.
"चल ठीक आहे... असेल प्रेम... पण मी म्हणतो हे असं आत्ता भेटलेल्या मुलाबरोबर व्हिडीओ कॉलवर कपडे उतरवणं..."
"तू आता म्हातारा झालायस... आमच्या जनरेशनमध्ये हे नॉर्मल आहे." टिपिकल टीनेज मुलीच्या बोलण्यात असावा तसा बेफिकीर स्वर गार्गीच्या बोलण्यात आला. लोकेश स्वतःशीच हसला.
"पोरी, हे जग तुला वाटतं तेवढं सरळ असतं तर किती बरं झालं असतं. पण हे त्याचं प्रेम बिम नाही.. नुसती भूक आहे. तरुण शरीराची भूक..."
"डॅडी...बास आता हे..." गार्गी रागवून म्हणाली, "मी रॉनीच्या विरोधात काही ऐकणार नाहीये. तुम्हाला त्याचं प्रेम समजत नसेल तर राहू देत. डोन्ट डिस्टर्ब मी..."
"ऐक अगं माझं... हे असं इंटरनेटवर व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून गैरवापर केला जाऊ शकतो..."
"रॉनी तसला मुलगा नाहीये." गार्गी आपल्या बापावर भसकन ओरडली, "ही लव्हज् मी. मी व्हिडीओ कॉलवरचं हे बंद केलं तरी त्याचं प्रेम कमी होणार नाहीये..." तिच्या ओरडण्यावर लोकेश संतापला. आपण आपल्या मुलीला परोपरी समजावयाचा प्रयत्न करतोय पण तिला समजतच नाही हे बघून वैतागला. त्याने तिचा लॅपटॉप आणि स्मार्ट फोन काढून घेतला. आणि त्या ऐवजी एक साधा फोन दिला फक्त.
"नुसता फोन करायचा तर कर... पण हे असले धंदे मी माझ्या घरात सहन करणार नाही." लोकेशने तिच्या खोलीतून बाहेर पडताना निक्षून सांगितलं.
झालं तेव्हापासून बाप-लेकीमध्ये एका शब्दाचाही संवाद झाला नाही. खरंतर व्हिडीओ कॉल बंद झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात त्या रॉनीने ब्रेक अप केलं होतं. लोकेश म्हणाला होता तसं त्याचं प्रेम बिम नव्हतं, त्याच्या त्या वयात एकोणीस वर्षांची एक मुलगी त्याला भाव देतीये बघून त्याची वासना चेतवली गेली होती इतकंच. लॉकडाऊन संपताच तिचा उपभोग घेऊन सोडून द्यायचाच त्याचा विचार होता. हे सगळं गार्गीला समजलं तेव्हा तिला धक्का बसला होता. आपल्या वडिलांना वाटत होतं तसाच हा मुलगा निघाला याबद्दल तिला अपराधीही वाटत होतं. पण कोणत्याही किशोरवयीन मुलीप्रमाणे ती बंडखोर होती, स्वतःची चूक स्वतःच्या पालकांसमोर मान्य कशी करणार हा प्रश्न होता. आणि त्यातही आपला लॅपटॉप आणि स्मार्ट फोन काढून घेण्याच्या कृतीवरचा तिचा राग अजून गेला नव्हता. त्यामुळे अबोला अजून कायम होता.
या घटनेच्या आधीही दोघांचं नातं फार छान होतं अशातला भाग नाही पण आता तर नातं पार बिघडलं होतं. त्यांचं नातं कधी छान बहरूच शकलं नाही कारण लोकेशचं काम. अगदी तरुण असतानाच आवश्यक ते शिक्षण पूर्ण करून तो मर्चंट नेव्हीमध्ये रुजू झाला. मर्चंट नेव्हीमध्ये गेली जवळपास सत्तावीस वर्षं अथांग समुद्रात बोटीवर जगभर भटकत जगला. प्रचंड पैसाही कमावला. पण कुटुंबाला द्यायला हवा तसा वेळ काही त्याला देता आला नाही. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्याचं स्मिताशी लग्न झालं. दोन वर्षांनी त्यांना गार्गी ही मुलगी झाली. तो सहा-सहा महिने बोटीवर असायचा तेव्हा गार्गी आणि स्मिता दोघीच घरी असायच्या. दोन असाईनमेंटच्या मध्ये महिना-दोन महिने जे मिळायचे तेवढाच काय तो लोकेशला आपली बायको आणि मुलीबरोबर सहवास मिळे. सहा महिन्यांपूर्वी मात्र यात बदल झाला जेव्हा लोकेशच्या बायकोला कॅन्सर झाला आणि त्यातच ती गेली. लोकेश त्यावेळी बोटीवर होता. तो परत येईपर्यंत दोन आठवडे उलटले. तेव्हापासून गार्गीशी जुळवून घ्यायचा त्याचा झगडा चालूच आहे. त्या दोघांना जोडणारी व्यक्तीच अचानक आयुष्यातून निघून गेल्याने एक चमत्कारिक पोकळी दोघांनाही जाणवत होती. पुन्हा बोटीवर जायचं असं लोकेशच्या मनात आलंही. पण त्या दिशेने प्रयत्न करण्याआधीच करोनाचा जगभर हाहाकार सुरू झाला आणि जग ठप्प झालं.
दोघांना एकमेकांच्या सहवासाची सवय नव्हती आणि आता अचानक सतत २४ तास दोघं एकत्र होते. साहजिकच एक अवघडलेपणा होता. त्यात गार्गी आत्ता या अशा वयात- जेमतेम २०. आणि समोर ४८ वर्षांचा लोकेश. आईची लाडकी गार्गी फार शिस्तप्रिय व्यक्ती नव्हती. उशिरापर्यंत जागरण, सकाळी उशिरा उठणे, हवं तेव्हा हवं ते खाणेपिणे असं स्वच्छंदी आयुष्य. तर त्या उलट अगदी लोकेशचा स्वभाव. बोटीवर राहण्याची सवय असल्याने अतिशय स्वावलंबी. लवकर झोपून पहाटे पाचला उठायची सवय. मग भरपूर व्यायाम करून ठरल्यावेळी ठरलेला नाश्ता, जेवण असं अगदी काटेकोर आयुष्य. दोघांची वेव्हलेंग्थच जमत नव्हती.
पण दोघांनाही देशपरदेशातले उत्तमोत्तम सिनेमे बघायची आवड आहे याचा त्यांना शोध लागला. रोज रात्री जेवण झाल्यार नेटफ्लिक्स किंवा मुबीसारखं अप्लिकेशन लावून चांगले चांगले सिनेमे बघायचे असं ठरूनच गेलं होतं जणू. आणि हळूहळू त्यांचं नातं सुधारू लागलं होतं. पण तेवढ्यात हे व्हिडीओ कॉलवालं प्रकरण घडलं आणि नातं बिनसलं. पण गेले आठवडाभर संवाद नसला तरी रात्रीचा सिनेमा दोघंही चुकवत नसत. एक दिवस त्याने सिनेमा निवडायचा एक दिवस तिने असं ठरून गेलेलं होतं तेही तसंच चालू होतं.

जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.