20-07-2021, 04:34 PM
थोड्याच वेळात शिल्पा वहिनींची त्याच्या पाठीवरची पकड ढिली झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंही त्यांच्या पाठीवरचा आणि डोक्यावरचा हात बाजूला करत त्यांना सोडून दिलं. पुन्हा शशांकला आवडणारी पापण्यांची उघडझाप करत त्यांनी डोळ्यांतलं पाणी परत पाठवायचा प्रयत्न केला. शशांकच्या मिठीतून बाहेर पडत त्या त्याला 'सॉरी' म्हणाल्या आणि काऊंटरवरुन टिश्यू पेपर घेत डोळे पुसू लागल्या.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.