14-07-2021, 05:02 PM
"अजून संपलं नाही माझं सांगून," शिल्पा वहिनी पुढं म्हणाल्या, "आत्ता तुम्ही येण्याआधीच एक वयस्कर काका माझ्याशी वाद घालून गेलेत. काय तर म्हणे, इथले सगळे पदार्थ बनवायला रिफाईन्ड तेलच वापरता का हे त्यांना किचनमधे जाऊन बघायचं होतं. मी त्यांना समजावून सांगत होते, पण ते ऐकतच नव्हते. शेवटी मी त्यांना स्पष्ट सांगितलं, खायचं असेल तर खा, नाहीतर दुसरीकडं जा! नुसता वैताग वैताग झालाय आज सकाळपासून..."
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.