08-07-2021, 12:55 PM
व तो पुन्हा ध्रुवल च्या तोंड वाटे त्याच्या पोटात गेला..देविका ते पाहून रडू लागली..आर्य वीर ही खूप चिंतित झाला..साधू ने त्यांना एक उपाय सांगितला..दुसरा दिवस ही ते साधू च्या गुहेत च राहिले ..ध्रुवल झोपला तसे त्याच्या पासून थोड्या अंतरावर देविका ने दूध भरून छोटी छोटी मडकी ठेवली... व ती ही गुहेच्या एका बाजूला जाऊन लपून बसली.. साप पुन्हा पोटातून बाहेर आला .. वळ वळ करत त्या दुधाच्या मडक्यात त्याने आपले तोंड घातले तसे आर्य वीर ने आपल्या तलवारीने त्या सापाचे दोन तुकडे केले..तसा साप म रून पडला...आर्य वीर व देविका ने साधू ला साप ध्रुवल च्या पोटात कसा गेला असेल विचारले ..तेव्हा साधू ने आपल्या दिव्य दृष्टी ने पाहून त्यांना सांगितले की सेनापती ने तो साप ध्रुवल च्या दालनात सोडला पणं तो साप पाण्याच्या भांड्यात जाऊन बसला..गडबडीने ध्रुवल ने रात्री ते पाणी न पाहतच पिले त्यामुळे त्या पाण्याबरोबर त्याच्या पोटात गेला..सेनापतीने दुसऱ्याचा वाई ट विचार करून केलेलं कृत्य त्याच्या वरच उलटले ..सापाचा पाहिलं दंश सेनापतीला च झाला..देविका ,आर्य वीर व ध्रुवल साधू महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा आपल्या राज्यात परत आले..ध्रुवल ची पोट दुखी कायम ची बंद झाली ..तो पूर्वी सारखा सर्वत्र बागडू लागला.. हळू हळू प्रजेला वाटणारी राजवाड्याची भीती नाहीशी झाली..राज्यात पुन्हा ..शांती निर्माण झाली.
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.