08-07-2021, 12:55 PM
देविका ने आर्य वीर ला सांगितले ..पहिल्यांदा तर तो तयार झाला नाही पणं देविका ने त्याला समजावले तेव्हा ..आर्य वीर ,देविका व ध्रुवल एका रथात बसून साधू च्या गुहेकडे निघाले...साधू जवळ पोहचल्या वर सर्वांनी साधू ला नमस्कार केला..देविका ने साधू ला विनंती केली ..ध्रुवल ला ठीक करण्याची..साधू महाराज अनेक विद्या न मध्ये पारंगत होते..अलौकिक शक्ती होती त्यांच्या कडे ..बरेच वर्ष तपशच्र्या केली होती त्यांनी..साधू नी त्यांना त्या रात्री तिथेच थांबण्या स सांगितले ..रात्र झाली तेव्हा सर्व जण झोपी गेले ..पणं ध्रुवल ला झोप वून..सर्व जण गुहेच्या एका बाजूला लपून बसले...थोड्या वेळ वाट पाहण्यात गेला की ..ध्रुवल च्या पोटातून एक साप बाहेर आला ..तशी देविका ,आर्य वीर सर्व जण खूप घाबरुन गेले..साधू ने त्यांना शांत राहायला सांगितले.. साप तोंडातून बाहेर येऊन इकडे तिकडे फिरू लागला..देवाच्या मूर्ती जवळ आलेले दूध त्याने पिऊन टाकले ..
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.