08-07-2021, 12:54 PM
राजकुमार ध्रुवल खूपच सुंदर होता.. गोरा... गोबऱ्या गाला चा ..हळू हळू तो मोठा होवू लागला..राजवाड्यात सर्वत्र धावू लागला..राजा राणी सर्व जण त्याच्या बाल लीला पाहून खूपच खुश होते.. छोटा राजकुमार आता आठ वर्षाचा झाला होता..ध्रुवल खूपच हुशार होता..तो सतत सर्वांना प्रश्न विचारत असे..सर्व जण त्याची उत्तरे देता देता थकत असे..देविका त्याला महादेवाच्या मंदिरात घेऊन जात असे..तिथे तो ही देविका बरोबर आपल्या बोबड्या बोलीत महादेवाची आरती गात असे..सर्व जण ऐकुन खूपच खुश होते..पणं सेनापती मात्र आतून तळमळत होता..आपल्या मुलीला कराग्रहात टाकलं आणि इथे आर्य वीर आणि देविका आपल्या मुलाचं कौतुक करत बसले आहेत याचा त्याला खूप राग येऊ लागला..आपण जसे आपल्या मुलीच्या विरहात तडफडत आहोत तसचं राजा व राणी ही झुरले पाहिजेत या विचारांनी तो राजकुमाराला मारायचं ठरव तो ..पणं राजकुमार मरायला हवा व त्याचा अाळ आपल्यावर येऊ नये याची खबरदारी घ्यावी लागणार अस तो ठरवतो..सेनापतीच्या ओळखीचा एक मांत्रिक असतो त्याच्या कडे खूप विषारी साप असतात..सेनापती मांत्रिका कडे जातो व त्याला आपली अडचण सांगतो ..
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.