08-07-2021, 12:52 PM
दुसऱ्या दिवशी आर्य वीर राज्यात फेर फटका मारायला घोड्यावरून निघतो...रस्त्यात भेटणाऱ्या आपल्या प्रजेला काही त्रास आहे का याची तो विचारपूस करतो..आपली प्रजा सुखी आणि समाधानी आहे हे पाहून तो ही खुश होतो.बरेच फिरून झाल्यावर तो परत आपल्या राज वाड्याकडे जायला निघतो..की दुरून त्याला एक सुंदर स.. गाणं ऐकू येत..तो त्या दिशेने जातो समोर एक छोटंसं महादेवाचं मंदिर असत..तिथे लोक पूजा व आरती करत असतात...आणि राजकुमार आर्य वीर जेव्हा त्या गाण म्हणणाऱ्या मुलीला पाहतो तेव्हा तो लगेच ओळखतो ..ती देविका असते..तिचाच मधुर आवाज आर्य वीर ला मंदिरा कडे खेचून आणतो ..सर्व जण राजकुमार आलेला पाहतात व त्याला मंदिरात जायला वाट मोकळी करून देतात..प्रत्येक जण आश्चर्य चकित होतो राजकुमार ला पाहून ..देविका त्याला आरती देते ..तो तिला पाहून हसतो ..देविका पुन्हा सुंदर स लाजते..देविका महादेवाची भक्त असते..ती दर रोज त्या मंदिरात पूजेला येत असते व महादेवाची आरती गात असते.आर्य वीर ला देविका खूपच आवडते..तो ही आता दर रोज मंदिरात येऊ लागतो..राजकुमार मंदिरात येऊ लागल्या मुळे ..मंदिरात बरीच वर्दळ चालू होते.. मंदिरं दर रोज सुशोभित करण्यात येऊ लागले...आर्य वीर ही मना पासून महादेवाची पूजा करीत असे..
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.