08-07-2021, 12:51 PM
आई आजारी असल्या मुळे ती आज आली होती..आर्य वीर ला तिचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा होते ..तिचा आवाज इतका गोड आणि सुंदर आहे तर ती कशी आहे असा तो विचार करत असतो..तो तिचं नाव विचारतो तेव्हा ती देविका सांगते..त्या नंतर मात्र तो तिला चेहऱ्यावर चा बुरखा दूर करायला सांगते..ती नकार देते पणं तो राजकुमार असतो आणि त्याची आज्ञा असते म्हंटल्यावर देविका आपला चेहरा राजकुमाराला दाखवते..राजकुमार आर्य वीर तर तिला पाहूनच तिच्या प्रेमात पडतो ..इतकी सुंदर असते देविका..लांब केस ..गोरी पान..कानात छोटेसे झूमके ..गळ्यात एक काळी दोरी व त्यात एक छोटासा निळा खडा..एकदम साधे कपडे पणं त्यात ही ती अप्रतिम सुंदर दिसत होती..राजकुमार तिला अस एक टक पाहत आहे हे पाहून देविका नकळत हसते आणि लाजते ही ..आर्य वीर तर तिच्या हसण्याने अजुनच घायाळ होतो..
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.