08-07-2021, 12:51 PM
एके दिवशी वशिका आपल्या एका दासिवर खूप ओरडत होती..राजकुमार आर्य वीर तिच्या दालना समोरून जात होता..की त्याला वाशीका चा आवाज ऐकू आला..त्याने आत जावून पाहिले तर एका दासीवर वशिका ओरडत होती..त्या दासीने आपले तोंड पदराने झाकले होते त्यामुळे तिचा चेहरा दिसू शकत नव्हता..दासीने चुकून वशिका च्या सुंदर ड्रेस वर पाणी सांडले होते..ती दासी शांत उभी राहून वशिका च बोलणं ऐकून घेत होती.. माफ करा राजकुमारी मी मुद्दाम नाही केलं..मी आज च इथे आली आहे माझी आई तुमच्या कडे काम करते आज ती आजारी आहे म्हणून मी आले आहे ..मला इथलं काही माहीत नाही ..पुन्हा चूक होणार नाही अस ती वशिका ला विनवत होती..राजकुमार त्या दिशेने आला..पणं तो त्या दासीचा आवाज ऐकुन स्थब्ध झाला होता..किती गोड आवाज आहे ..तो आतुरतेने तिचं बोलणं ऐकत होता.. वशिका ने आर्य वीर ला पाहिलं व ती त्या दासिवर ओरडणं सोडून तिला जा म्हणून सांगते..दासी पळतच बाहेर जाते.. आर्य वीर ही तिच्या मागे जातो..त्याला तिचा चेहरा पाहायचा असतो.. दासी बागेच्या दिशेने जाते ..तिथे जावून ती रडत असते ..की आर्य वीर मागून येतो ..ती त्याला पाहून शांत होते..आर्य वीर तिला ती कोण आहे विचारतो..तेव्हा ती सांगते की ती त्याच्या सैन्यात काम करणाऱ्या एका सैनिकाची मुलगी आहे व तिची आई राजवाड्यात दासी आहे ..
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.