25-06-2021, 03:37 PM
संगीताताईने थोडा विचार केला आणि ती तयार झाली. माझा चेहरा खुलला. मग आम्ही समुद्रकिनारी गेलो जो तेथून दहा मिनीटावर होता. समुद्रकिनारी असलेल्या भेळपुरीच्या स्टालवरुन आम्ही दोन भेळपुरी आणि पाण्याची बाटली घेतली आणि नंतर समुद्राच्या कट्ट्यावर जावून बसलो. समुद्राकडे तोंड करुन, आमचे पाय खाली सोडुन आम्ही एकमेकांशेजारी बसलो होतो. आम्ही बसलो होतो तेथुन समुद्राची लेवल थोडी खाली होती आणि मोठ मोठाले खडक आणि सिंमेटचे ब्लॉक त्या कट्ट्याखाली टाकलेले होते. समुद्राचे खारे वारे वहात होते. पाण्याच्या लाटा खडकावर आदळत होत्या, आवाज करत आणि पाणि उडवत. खूप छान वातावरण होते ते!
जिंदगी की राहों में रंजो गम के मेले हैं.
भीड़ है क़यामत की फिर भी हम अकेले हैं.
