23-09-2020, 02:37 PM
दुसरा दिवस:
सर्वांना जायची घाई असल्यामुळे आणि एकच बाथरूम असल्यामुळे सकाळी - सकाळी तयारीची जशी काही झुंबड उडाली होती. मला जाग आली तेव्हा आई व ताई किचन मध्ये ब्रेकफास्टची तयारी करत होत्या. काकू आणि माझ्यासाठी लंच पण तयार करून ठेवला होता. बेडरूमचे दार उघडे असल्यामुळे, माझ्या बेडवर झोपलेली काकू आणि नीतू दिसली. काका व बाबा गोल्याला सांभाळत हॉल मध्येच बोलत बसलेले होते. दाजी दिसत नसल्यामुळे, ते बाथरूम मध्ये अंघोळ करत असावेत, असा अंदाज काढला. काही वेळाने सर्वांनी आळी-पाळीने अंघोळ वगैरे उरकून घेतली आणि ब्रेकफास्ट केला. मला बाहेर जायचे नसल्यामुळे, मी अंघोळ न करताच ब्रेकफास्ट केला. नंतर काकूंची बॅग सोडून, बाकीच्या बँगा गाडीत नेऊन ठेवल्या. काही वेळांनी सर्व जण निघून गेले. जातांना काकांनी खर्चासाठी एक्सट्रा पैसे दिले आणि बाकी सर्वांनी काही ना काही इंस्ट्रुकॅशन्स .. मी शांतपणे सर्वांचे ऐकून घेतले. सर्वांना बाय करून मी माझ्या फ्लॅट मध्ये आलो.
आईने जातांना काकूला मेडिसिन दिली होती आणि काकूला आराम करावयास सांगितला होता. मी काकू जवळ आलो. काकू अंगावर घेऊन, झोपण्याचा प्रयत्न करत होती. मी तिच्या जवळ येत म्हणालो-
मी: काकू .. (मी हळूच काकूंना आवाज दिला)....
काकू: (डोळे उघडत, माझ्याकडे बघितले आणि इशाऱ्यानेच "काय" विचारले) ...
मी: काकू, मी हॉल मध्येच आहे. काही लागले तर आवाज द्या ... ठीक आहे ...
काकू: (स्माईल करत होकारार्थी मान डोलावली).
मी पण स्माईल करत पुढे होऊन तिच्या कपाळावर हात ठेवून ताप चेक केला. ताप आता बराच कमी वाटत होता. मेडिसिनमुळे घाम येऊन ताप कमी झाला होता. मग मी काकूला “आराम करा” असे म्हणत, बाहेर हॉल मध्ये येऊन बसलो.