22-09-2020, 10:23 PM
पहिला दिवस:
रविवार असल्यामुळे मी सिनेमा बघायला आलेलो होतो. तेव्हा अचानक माझ्या काकांचा फोन आला.
मी: हॅलो काका
काका: हॅलो आ ण्या .. कसा आहेस?
मी: आय एम फाईन काका ...
काका: कुठे आहेस?
मी: काका, मी सिनेमा बघायला आलेलो आहे ... काही काम आहे का?
काका: फ्लॅट वर येऊ शकतोस का?
मी: काय झाले काका? सर्व ठीक आहे ना ?
मग काकांनी काकूंच्या आजारा बद्दल सांगितले आणि हे ही सांगितले कि आम्ही काही वेळात फ्लॅट वर येत आहोत ते ... मग मी मित्रांना माहिती देऊन घराकडे निघालो. साधारण २० मिनिटांनी मी माझ्या वन एचके फ्लॅटवर पोहोचलो देखील. घरची मंडळी अजून तरी आलेली नव्हती. त्यामुळे मला फ्लॅटची साफ-सफाई करण्यासाठी वेळ मिळाला. फ्लॅटची साफ-सफाई उरकल्यानंतर, मी सुटकेचा स्वास सोडत, पलंगावर आडवा पडलो.
काही वेळाने डोअर बेल वाजली. मी दार उघडले. सर्व जणांना बघून खूप आनंद झाला. पण काकूंची तब्येत खराब असल्यामुळे सर्वांचा थोडासा हिरमूस झालेला होता. उर्वशी काकूंना माझ्या बेडवर झोपवून, सर्व जण मिळेल त्या जागी बसले. फ्लॅट लहान असल्यामुळे बेडरूम मध्ये एकच पलंग होता. लहानसं किचन आणि हॉल मध्ये एक टेबल आणि चार-पाच खुर्च्या. आई, मोहिनीताई, गोल्या व नीतिका (काकूंची मुलगी) काकूंच्या शेजारी पलंगावर बसले. बाबा, काका, दाजी आणि मी हॉल मध्ये बसलो. डॉक्टरांनी सक्तीचा आराम सांगितला होता. त्यामुळे आता पुढे काय करावे, असा प्रश्न सर्वांसमोर पडला होता. कोणाला ही काही सुचत नव्हते. तेवड्यात काका म्हणाले-
काका: भाऊ, एक काम करा, मी, नीतू, हिच्या सोबत इथे थांबतो. तुम्ही जा फिरायला.
बाबा काही बोलणार इतक्यात नीतू, बेडरूम मधून धावत काका जवळ येत बोलली -