28-01-2020, 06:49 PM
आम्ही हॉटेल कडे जात असतांना ताईने अचानक कार थांबवायला सांगितले. मी तिच्याकडे बघितले व कार साइडला घेतली.
मोहिनीताई: मला ना त्या शॉप मध्ये जायचे आहे.
एका कपड्याच्या शॉपकडे इशारा करत ताई मला म्हणाली. मग मी कार वळवून शॉपसमोर पार्क केली. शॉप चांगलेच मोठे होते. मी आणि ताई आत आलो. आम्ही आत येऊन INQUIRY केली. ताई लेडीज सेक्शन मध्ये गेली. जाता जाता म्हणाली-
मोहिनीताई: अहो ... (हसत) तुम्ही इथे थांबा, मी आलेच ...
मी: ओके.
मी उगाच इकडून तिकडे काहीतरी बघत फिरत होतो. थोड्यावेळाने ताई वापस आली व माझ्याकडून कार्ड घेऊन गेली. मग तिने बिल पे केले. ताईने काय खरीदी केले आहे, हे जाणून घेण्याची मला उत्सुकता लागली होती. तरी पण मी तिला डायरेक काही विचारलं नाही. कदाचित तिला काही सरप्राइज द्यायचे असेल. मला तिचे सरप्राइज खराब करायचे नव्हते. म्हणून मी ताईशी त्या विषयी काही बोललो नाही. आम्ही कार मध्ये येऊन बसलो व पुन्हा कार चालवू लागलो. काही वेळाने ताईला काही आठवल्यागत ती मला म्हणाली-
मोहिनीताई: अहो ऐका ना ..
तिच्या “अहो” ने पुन्हा एकदा मला घायाळ करून सोडले.
मी: हा बोल गं?
मोहिनीताई: मला ना ब्युटी पार्लर मध्ये जायचे आहे.
मी: ठीक आहे.
मग मी कार रोडच्या साइडला थांबवली व मोबाइल काढून जवळचे ब्युटी-पार्लर शोधू लागलो. बरेच ऑप्शन्स होती. मी रेटिंग वगैरे बघून एक ऑप्शन निवडले व त्या दिशेने कार वळवली.
ब्युटी-पार्लर दूर नसल्यामुळे आम्ही लवकरच तिथे पोहोचलो. ताई कार मधून उतरली व पार्लर मध्ये गेली. मी आपली कार साइडला पार्क करून ताई जवळ आलो.
मोहिनीताई: अहो!! (हसत) तुम्ही इथे बस. (एका सोफ्याकडे इशारा करत).मी आलेच थोड्याच वेळात.
मला माहित होते कि बायकांचा थोडा वेळ म्हणजे काय ते. मग मी मोबाईल मध्ये काहीतरी बघत बसलो. अचानक मला एक आयडिया सुचली, म्हणून मी चुडा शॉप ऑनलाइन शोधू लागलो. मी सर्व माहिती काढली. मग लक्षात आले कि माझ्या कडे ताईची बांगडी नाहीये, साइजसाठी. मी उठलो व काउंटर जवळ आलो. काउंटरवर बसलेल्या सुंदर देखण्या मुलीस म्हणालो-
मी: एक्सक्यूज मी मॅम!
ती: येस सर! मै आपकी किस तरह से मदद कर सकती हू ?
मी: जी मै मोनिका जी के साथ हू .. क्या आप मेरा एक काम कर सकती हो?
ती: जी सर. क्यू नही. बाताइये ?
मी: अगर हो सके तो आप मोनिका जी से उनकी एक चुडी ले आईये.
त्या मुलीने माझ्याकडे आश्चर्याने बघितले, पण काही न बोलता आत गेली. हॉटेल जवळ असते तर मी रूममध्ये जाऊनच ताईची एक बांगडी घेऊन आलो असतो. मी विचारमग्न असतांना, ती मुलगी बाहेर आली. मला ताईची बांगडी दिली.
मी: थँक यु!
ती: वेल कम सर ! (स्माईल देत).
मी ताईची बांगडी वरच्या खिश्यात ठेवली. कार काढून शॉपच्या दिशेने निघालो.